भाविकांना मोफत भोजनप्रसाद

सन २००८ साली श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आम्ही श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट या संस्थेचा शुभारंभ केला.सेवाभावी वृत्तीने सुरु केलेल्या आमच्या या कार्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. परगावाहून आलेले सुमारे तीन ते पाच हजार भाविक रोज आपल्या अन्नछत्रात मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेत आहेत.उत्सवकाळात हा आकडा दहा हजारांहून अधिक होतो.कितीही गर्दी असली तरी सर्वांनाच अतिशय चविष्ट व सात्विक भोजनप्रसाद मिळाल्यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर जे आनंद, समाधान व तृप्तीचे भाव दिसून येतात तोच आम्ही आमचा नफा समजतो. मंदिरापासून जवळच असणारा अद्ययावत व प्रशस्त असा सुशोभित भोजन हाल, जेवणाचा उत्तम दर्जा, स्वच्छता व टापटीप, नम्र व तत्पर सेवा या वैशिष्ट्यांमुळे आपल्या अन्नछ्त्राने कोल्हापूरच्या वैभवात मानाचा तुरा खोवला आहे.

नूतन धर्मशाळा
नूतन धर्मशाळा
नूतन धर्मशाळा
नूतन धर्मशाळा