श्री महालक्ष्मी दंतोपचार केंद्र
आजच्या धकाधकीच्या काळात निरोगी शरीरसंपदा असणे फार गरजेचे आहे. यासाठी दातांचे आरोग्य चांगले असणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. दातांचे आरोग्य चांगले नसेल तर इतर सर्व पथ्य पाळूनही शरीराला व्याधी जडू शकतात. म्हणून दातांचे विकार होऊ नयेत याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. दाताचे दुखणे निघाले तर ते सहन न होण्यासारखे असते आणि त्याच्या उपचारांचा खर्च परवडण्यासारखा नसतो. सर्वसामान्य लोकांचा विचार करता त्यांना दंतोपचार करणे कठीण जाते . ही अडचण लक्षात घेऊन सर्वसामान्य लोकांना माफक दरात दंतोपचार देण्यासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट तर्फे श्री महालक्ष्मी दंतोपचार केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रात होणाऱ्या उपचारात ५० ते ६० % सवलत दिली जाते. दातांच्या सर्व दुखण्यांवर आधुनिक आणि अल्पदरात उपचार मिळत असल्यामुळे लोकांना त्याचा आधार मिळाला व अल्पावधीतच हे केंद्र लोकप्रिय झाले आहे. या केंद्रात आतापर्यंत सुमारे १५ हजार हून अधिक गरजूंनी या सेवेचा लाभ घेतला आहे. सदरचे दंतोपचार केंद्र डॉ. चेतन सुगंधी (एम.डी.एस.) व त्यांच्या भगिनी डॉ. नेहा सुगंधी ( एम.डी.एस.) यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या अत्यंत उपयुक्त अशा उपक्रमाचे सर्वांकडून खूप कौतुक होत आहे.