नूतन धर्मशाळा

कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत भोजनप्रसाद देणाऱ्या श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट ने आपल्या सामाजिक उपक्रमात एक पाउल पुढे टाकत भाविकांना अल्प दरात राहण्याची सोय व्हावी म्हणून सर्वसोईंनी युक्त अशी धर्मशाळा उभारली आहे. परगावच्या भाविकांची राहण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही धर्मशाळा बांधली गेली. ही धर्मशाळा मंदिरापासून अत्यंत जवळ असून यामध्ये आधुनिक व सुसज्ज अशा २४ खोल्या आहेत. धर्मशाळेची अंतर्गत सजावट अतिशय सुंदर व आकर्षक आहे. पार्किंग व्यवस्था, लिफ्टची सोय, जनरेटर, २४ तास पाणी, स्वच्छता व नीटनेटकेपणा अशी या धर्मशाळेची वैशिष्ट्ये आहेत. ही धर्मशाळा भाविकांसाठी २४ तास खुली असून येथील सर्व कर्मचारी प्रामाणिक व नम्र आहेत.

मंदिराच्या जवळ शिवाय कमी दरात सर्वसोयींनी युक्त अशा खोल्या असल्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. एकदा या ठिकाणी आलेले भाविक पुन्हा इथेच येण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे ही धर्मशाळा अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. अत्यंत उत्कृष्ट व्यवस्थापनेबद्दल भाविक संस्थेची खूप प्रशंसा करत आहेत. अशी ही धर्मशाळा कोल्हापूरच्या वैभवात नक्कीच भर घालत आहे.

नूतन धर्मशाळा
नूतन धर्मशाळा
नूतन धर्मशाळा
नूतन धर्मशाळा
नूतन धर्मशाळा