श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट

साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असणाऱ्या आपल्या कोल्हापूर या तीर्थक्षेत्राचा महिमा आपण सर्व जाणताच. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या आपल्या करवीर नगरीमध्ये साक्षात श्री दत्तगुरू माध्यान्ह भोजनासाठी येतात याहून भाग्य कोणते असेल. अशा या पवित्र ठिकाणी जगभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात पण त्यांना भोजनप्रसाद देण्यासाठी एखाद्या अन्नछत्राची सोय इथे नाही ही खंत मनाला सारखी लागत होती. या तळमळीतून करवीर निवसिनीच्या दरबारात भाविकांना मोफत भोजनप्रसाद देण्याच्या हेतूने आणि अन्नदानाचे महत्व लक्षात घेऊन सन २००८ साली श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आम्ही श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट या संस्थेचा शुभारंभ केला.सेवाभावी वृत्तीने सुरु केलेल्या आमच्या या कार्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. परगावाहून आलेले सुमारे तीन ते पाच हजार भाविक रोज आपल्या अन्नछत्रात मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेत आहेत.उत्सवकाळात हा आकडा दहा हजारांहून अधिक होतो.

श्री. राजू अ. मेवेकरी – जाधव

संस्थापक – अध्यक्ष

संस्थेचे विशेष उपक्रम

शारदीय नवरात्रोत्सव – अष्टमी प्रसाद

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूर हे पूर्णपीठ असून आद्य शक्तीपीठ आहे. त्यामुळे भाविकांसाठी हे पूज्य तीर्थक्षेत्र आहे. प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला फार महत्व आहे. अशा या शक्तिदेवतेचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव होय. देवीची उपासना करण्याचा हा महत्वाचा कालावधी मानला जातो. कोल्हापूर येथे नवरात्र खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरे केले जाते. देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये येतात. नऊ दिवसांचा हा उत्सव सोहळा असतो. या उत्सवात श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचा खूप मोठा सहभाग असतो. या काळात देवीचे दर्शन घेतल्यानंतर भोजनप्रसाद घेण्यासाठी भाविकांचे पाय आपोआपच अन्नाछ्त्राकडे वळतात. दररोज ८ ते १० हजार भाविक भोजनासाठी येत असल्यामुळे अन्नछत्राची वेळ २ तासाने वाढविली जाते. एवढी गर्दी असूनही येथे सर्व भाविकांना चविष्ट व सात्विक भोजन दिले जाते.

याशिवाय नवरात्रात अष्टमी दिवशी श्री अंबाबाई नगरप्रदक्षिणेला बाहेर पडते. यावेळी या मार्गावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची खूप गर्दी असते. या निमित्ताने सर्व भाविकांना श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कडून मोफत प्रसादाचे वाटप करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अतिशय भक्तिपूर्ण व प्रसन्न वातावरणात उपस्थित सर्व भाविकांना संस्थेतर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसाद ग्रहण केल्यावर भाविकांनी समाधानाने संस्थेचे आभार मानले . यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

100000

मोफत भोजनप्रसाद

15

विशेष उपक्रम

13

वर्षे पूर्ण

2

धर्मशाळा

नूतन धर्मशाळा

कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत भोजनप्रसाद देणाऱ्या श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट ने आपल्या सामाजिक उपक्रमात एक पाउल पुढे टाकत भाविकांना अल्प दरात राहण्याची सोय व्हावी म्हणून सर्वसोईंनी युक्त अशी धर्मशाळा उभारली आहे. परगावच्या भाविकांची राहण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही धर्मशाळा बांधली गेली. ही धर्मशाळा मंदिरापासून अत्यंत जवळ असून यामध्ये आधुनिक व सुसज्ज अशा २४ खोल्या आहेत. धर्मशाळेची अंतर्गत सजावट अतिशय सुंदर व आकर्षक आहे. पार्किंग व्यवस्था, लिफ्टची सोय, जनरेटर, २४ तास पाणी, स्वच्छता व नीटनेटकेपणा अशी या धर्मशाळेची वैशिष्ट्ये आहेत. ही धर्मशाळा भाविकांसाठी २४ तास खुली असून येथील सर्व कर्मचारी प्रामाणिक व नम्र आहेत.

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट नूतन धर्मशाळ

Testimonials

Donation

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट नूतन धर्मशाळ
Testimonial